Hich Ti Ramachi Swamini

Sudhir Phadke, G D Madgulkar

जांबुवंतानी हनुमंताच्या असीम सामर्थ्यच वर्णन करताच
स्वतः हनुमंताचे भाऊ देखील स्मरण पाऊ लागले
बघता बघता त्याने प्रचंड रूप धारण केलं
वानरांना अत्यंत हर्ष झाला ते त्याचे स्तुती गाऊ लागले
वायू पुत्र हनुमान महेंद्र पर्वतावर अडुळ झाला
नंतर त्याने लंकेचा आठव केला आणि आकाश मार्गाने उड्डाण केलं
तो त्रिकूना चरावर येउन पोहचला
इंद्राच्या आंबरावती सारखी भासणारी लंका त्याने दुरून अवलोकन केली
त्या संपन्न नगरीचे रक्षण करण्यासाठी बलाढ्य राक्षस सिद्ध होते
त्या नागरीमध्ये केवळ प्रवेश करणे हि कठीण होत
हनुमंताने सुष्म देह धारण केला आणि रात्री नगर धुंडायला पारंभ केला
लंका पती रावणाचा अंतकूल त्याने धुंडाळ परंतु कुठेच मैथिली त्याच्या दृष्टीस पडली नाही
निराश होऊन तो अशोक वना भोवती असलेल्या एका कोटावर येऊन बसला
सहज कुतूहलाने त्याने इकडे तिकडे पाहिले तो त्याच वनामध्ये
एका वृक्षाच्या खाली एक सुंदर परंतु मलीन वसना कृशांगी
अशी स्त्री बसलेली त्याने पाहिली काही राक्षसी तिच्या भोवती पहारा करत आहेत
हे हि त्याने पाहिले त्याने तेथून उड्डाण केल आणि ती स्त्री ज्या वृक्षाखाली बसली होती
त्याच वृक्षाच्या एका फांदीवर जाऊन तो बसला रामाने केलेल्या वर्णनाशी तंतोतंत जुळेल
अशी हि पहिली स्त्री त्याने ह्या लंकेमध्ये पाहिली त्याची खात्री पटली
हीच ती रामांची स्वामींनी सीता असली पाहिजे
आणि तो स्वतःशीच म्हणू लागला
हीच ती रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी
चंद्रविरहिणी जणूं रोहिणी
व्याघ्रींमाजी चुकली हरिणी
शयेन कोटरीं फसे पक्षिणी
हिमप्रदेशीं थिजे वाहिनी
रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी

मलिन कृशांगी तरी सुरेखा
धूमांकित कीं अम्निशलाका
शिशिरीं तरि ही चंपकशाखा
व्रतधारिणि ही दिसे योगिनी
रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी

रुदनें नयनां येड अंधता
उरे कपोलीं आर्द्र शुष्कता
अनिद्रिता ही चिंताक्रान्ता
मग्न सारखी पती चिंतनीं
मग्न सारखी पती चिंतनीं
रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी

पंकमलिन ही दिसे पद्मजा
खचित असावी सती भूमिजा
किती दारुणा स्थिती दैवजा
अपमानित ही वनीं मानिनी
अपमानित ही वनीं मानिनी
रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी

असुन सुवर्णा श्यामल मलिना
अधोमुखी ही शशांक वदना
असुन सुवर्णा श्यामल मलिना
अधोमुखी ही शशांक वदना
ग्रहण कालिंची का दिग्ललना
हताश बसली दिशा विसरुनी
रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी

संदिग्धार्था जणूं स्मृती ही
अन्यायार्जित संपत्ती ही
अमूर्त कोणी चित्रकृती ही
पराजिता वा कीर्ती विपिनीं
पराजिता वा कीर्ती विपिनीं
रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी

रामवर्णिता आकृति मुद्रा
बाहुभूषणें प्रवाल मुद्रा
रामवर्णिता आकृति मुद्रा
बाहुभूषणें प्रवाल मुद्रा
निःसंशय ही तीच सु भद्रा
हीच जानकी जनकनंदिनी
हीच जानकी जनकनंदिनी
रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी

असेच कुंडल वलयें असलीं
ऋष्यमुकावर होतीं पडलीं
असेच कुंडल वलयें असलीं
ऋष्यमुकावर होतीं पडलीं
रघुरायांनी ती ओळखिलीं
रघुरायांनी ती ओळखिलीं
अमृत घटी ये यशोदायिनी
रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी
हीच ती रामांची स्वामिनी

Curiosidades sobre la música Hich Ti Ramachi Swamini del सुधीर फडके

¿Quién compuso la canción “Hich Ti Ramachi Swamini” de सुधीर फडके?
La canción “Hich Ti Ramachi Swamini” de सुधीर फडके fue compuesta por Sudhir Phadke, G D Madgulkar.

Músicas más populares de सुधीर फडके

Otros artistas de