Nachat Nachat Gaave

Jagdish Khebudkar, Sudhir Phadke

नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें

आज कशाची किमया घडली कणकण गंधित झाला
एक अनामिक आनंदानें जीवच मोहुन गेला
या वेडाच्या लहरीसंगे
या वेडाच्या लहरीसंगे तन्‍मय होउन जावें
ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें

माझी मजला जाण नसावी अंतर माझे भोळें
अवघी काया वार्‍यावरतीं सूरच होउन डोले
अणुरूपानें परमात्‍म्‍याला
अणुरूपानें परमात्‍म्‍याला भेटुन मागे यावें
ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें

आयुष्याला उधळित जावें केवळ दुसर्‍यापायीं
आयुष्याला उधळित जावें केवळ दुसर्‍यापायीं
या त्यागाच्या संतोषाला जगिं या उपमा नाही
जन्म असावा देण्यासाठीं
जन्म असावा देण्यासाठीं एक मनाला ठावें
ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें

Curiosidades sobre la música Nachat Nachat Gaave del सुधीर फडके

¿Cuándo fue lanzada la canción “Nachat Nachat Gaave” por सुधीर फडके?
La canción Nachat Nachat Gaave fue lanzada en 2004, en el álbum “Bajiravacha Beta”.
¿Quién compuso la canción “Nachat Nachat Gaave” de सुधीर फडके?
La canción “Nachat Nachat Gaave” de सुधीर फडके fue compuesta por Jagdish Khebudkar, Sudhir Phadke.

Músicas más populares de सुधीर फडके

Otros artistas de